हसूलमधून २५ वर्षीय तरुण बेपत्ता; सहा जणांवर गुन्हा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): हसूल परिसरातील मयूर पार्क, मारोतीनगर येथून गोविंद ज्ञानेश्वर सरोदे (वय २५) हा तरुण बेपत्ता झाल्याप्रकरणी हसूल पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याचे वडील ज्ञानेश्वर दशरथ सरोदे (वय ४३) यांनी तक्रार दिली आहे. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास गोविंद हा परभणी जिल्ह्यातील सेलू येथील न्यायालयात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला. मात्र, तो
परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. सेलू न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावरून गोविंद आणि त्याची पत्नी रूपाली यांच्यात वाद असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातून गोविंदचे अपहरण झाले असावे, असा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. सहा संशयितांची नावे तक्रारीत देण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions